आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिल्डरच्या ऑफिसवर अमरावतीत हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - फ्लॅटच्या बांधकामासाठी होत असलेल्या विलंबाने संतप्त झालेल्या नागरिकांनी सोमवारी शहरातील ‘राणा लँडमार्क’च्या कार्यालयावर हल्लाबोल केला. या वेळी तब्बल 400 नागरिकांनी कार्यालयाची नासधूस केली.


राणा लॅण्डमार्कने कठोरानाका भागात नागरिकांना फ्लॅटचे स्वप्न दाखविले होते. त्यावेळी 300 ते 400 नागरिकांनी बुकिंगही केले. मात्र, दोन वर्षे लोटली तरीही या जागेवर खड्डाही खोदण्यात आलेला नाही. आपली फसववणूक होत असल्याचे लक्षात आल्याने नागरिक सोमवारी ‘लॅण्डमार्क’च्या कार्यालयात गेले, तेव्हा त्यांना करारनाम्याची कागदपत्रे आढळून आली नाहीत. मागणी केल्यानंतरही तेथील कर्मचारी टाळाटाळ करीत असल्याने संतप्त जमावाने कार्यालयाची तोडफोड केली.