आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहकार महर्षी बाबासाहेब केदार यांचे नागपुरात निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- विदर्भातील ज्‍येष्‍ठ नेते आणि माजी ग्रामविकास मंत्री बाबासाहेब केदार यांचे आज (शुक्रवार) सकाळी निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. आमदार सुनील केदार यांचे ते वडील होत. सहकार क्षेत्रात बाबासाहेब केदार यांनी मोठी कामगिरी बजावली. त्‍यांनी नागपूरचे पालकमंत्रीपदही भूषविले होते. शेतक-यांच्‍या हितांसाठी ते बरेच झटले होते. शेतक-यांचे अनेक प्रश्‍न त्‍यांनी शासनदरबारी मांडले.

बाबासाहेब केदार यांनी विदर्भात सहकाराचे जाळे उभारले. सहकार महर्षी म्‍हणून त्‍यांचा गौरव केला जायचा. कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीवर त्‍यांचे वर्चस्‍व कायम होते. नागपूरच्‍या राजकारणात त्‍यांचा प्रचंड दबदबा होता. युती सरकारच्‍या काळात त्‍यांनी 4 नवखे उमेदवार युतीच्‍या उमेदवारांविरुद्ध उभे केले होते. हे चारही उमेदवारांना त्‍यांनी विजयी करुन दाखविले होते. विदर्भातील संत्रा उत्‍पादक शेतक-यांसाठीही त्‍यांनी भरीव कार्य केले होते. संत्र्याची सर्वप्रथम निर्यात त्‍यांनीच केली होती.