आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्मरणात राहणारा पहिला दिवस; विद्यार्थ्यांसोबतच गुरुवारी पालकांचीही लगबग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वयाची कितीही वर्षे झाली, पृथ्वीच्या टोकावर जगात कोठेही असलो तरी शाळेचा पहिला दिवस कायम स्मरणात राहतो. काळ बदलला, आधुनिक युगात मॉडर्न शाळा आल्या... मात्र, शाळेच्या पहिल्या दिवसाबद्दलची त्या निरागस बालमनाची भावना बदलली नाही. त्याचे भावविश्व, शाळा या संकल्पनेबद्दल त्याच्या बालमनाने घेतलेली स्वप्नातील झेप कालही तीच होती, आजही तीच आहे आणि उद्याही तीच असणार..! शाळेबद्दलचं, शाळेतल्या पहिल्या दिवसाबद्दलचं मुलांचं कुतूहल सारखंच राहणार..! तोच धागा पकडण्याचा ‘दिव्य मराठी’ने केलेला प्रयत्न...
शाळेच्या पहिल्या ठोक्याला शहरातील विविध शाळांमध्ये हजारो विद्यार्थ्यांना गणवेश, पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. राजापेठ येथील स्व. दौलतभाई देसाई मतिमंद मुलांच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना मिठाई भरवण्यात आली. जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कूलमध्ये ‘गिरवू अक्षर, होऊया साक्षर,’ अशी सुंदर रांगोळी घालण्यात आली होती. जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. मधल्या सुटीत विद्यार्थ्यांना मिठाईवाटप करण्यात आली. विद्यार्थ्यांचे स्वागत तर झाले, आता त्यांना वर्षभर शाळेत आनंददायी वातावरण आणि प्राथमिक सुविधा उपलब्ध करुन देणे संबंधितांची जबाबदारी आहे. ती पार पाडण्याचा संकल्प करण्याचा हा दिवस...!
पुढील स्लाईडवर पहा...
कोणकोणत्या शाळेंनी कसा साजरा केला हा दिवस... आणि शाळेच्या पहिल्या दिवसाचे काही क्षण ....