आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Badnera Railway Station On All Trains Stop For Dr.Ambedkar Mahaparinirwan Din

नागपूर-मुंबई गाड्यांना बडनेरात थांबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायींना मुंबईला पोहोचणे आणि परतणे सोयीचे व्हावे म्हणून मध्य रेल्वेने मुंबई-नागपूर लोहमार्गावर खास सहा रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. या सर्व सहा गाड्यांना बडनेरा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाड्यांमधून साधे तिकीट काढून प्रवास करता येईल.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि दादर येथून या गाड्या सोडल्या जातील. या सर्व गाड्यांना सर्वसामान्य र्शेणीचे एकूण 11 डबे असतील. शिवाय दोन सामान्य र्शेणी डबे आणि ब्रेक व्हॅन असेल. गाड्यांना कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, अजनी येथे थांबा राहील.
मुंबईहून अशा निघतील गाड्या
6 डिसेंबर : पहिली गाडी मुंबईहून 04:05 वाजता रवाना होईल. दुसरी गाडी 06:45 वाजता रवाना होईल.
7 डिसेंबर : पहिली गाडी दादर येथून दुपारी 12:30 ला निघेल. दुसरी रात्री 12:40 ला रवाना होईल.
8 डिसेंबर : पहिली गाडी 06:40 वाजता रवाना होईल. दुसरी गाडी रात्री 12:40 वाजता निघेल.