आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँका झाल्या ढणढण, रिझर्व्ह बँकेकडून केला जाताेय राशीचा अत्यल्प पुरवठा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा - रिजर्व्ह बँकेची 'मुद्रा पेठीका' असलेल्या येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) शाखेत रिजर्व्ह बँकेकडून अत्यल्प राशीचा पुरवठा होत असल्यामुळे बहुतांश बँकांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. एसबीआयसह अनेक बँकांमध्ये व्यवहारासाठी राशीचा तुटवडा जाणवत असल्याने शहरातील अंदाजे ५०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झालेत. या बँकांना व्यवहार करण्यासाठी परिसरातील इतर शाखांमधून राशीची तडजोड करावी लागत आहे. याचा फटका व्यापारी, शेतकरी, ग्राहकांस सर्वच घटकांना बसत आहे.
जिल्ह्यात अमरावती शहरानंतर अचलपूर-परतवाडा शहर ही दुसरी मोठी व्यापारी बाजारपेठ आहे. एसबीआयच्या एकट्या परतवाडा शाखेतून दररोज ते कोटी रुपयांचे व्यवहार होत असतात. याशिवाय इतर बँकांची उलाढालही कोट्यवधी रुपयांची आहे. मध्य प्रदेशातील परिसरात सर्वांत मोठी बाजारपेठ असल्याने येथे मोठ्या प्रमाणात व्यापार सुरू असतो. बाजार समिती, कपडा, किराणा आदींचीही येथे मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे एसबीआयसह इतर बँकाचे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार येथे होत असतात.
परतवाडा येथील स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा ही रिजर्व्ह बँकेची 'मुद्रा पेठीका' (करंसी चेस) आहे. या पेठीकेत रिजर्व्ह बँकेकडून राशी जमा केल्यानंतर शहरातील अभिनंदन बँक, खामगाव बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, युिनयन बँक आदी सर्वच बँकांना पुरवठा केला जातो; परंतु डिसेंबर महिन्यापासून रिजर्व्ह बँकेकडून एसबीआयच्या 'मुद्रा पेठीकेत' राशीचा अल्प पुरवठा केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, एसबीआयसह इतर बँकेत राशीचा तुटवडा असल्याने शहरातील दररोजचे सरासरी ते १० कोटी रुपयांचे व्यवहार मंदावले आहेत. पैशांअभावी शहरात चणचण निर्माण झाल्याने एसबीआयसह इतर बँकांना परिसरातील आपल्या शाखेतून राशी आणावी लागत आहे. परंतु त्यानंतरही तुटवडा कायम असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. एसबीआय शाखेत पैसे नसल्यामुळे बँक प्रशासनाने रोकड देण्यास असर्मथता दर्शवली. दरम्यान, रिजर्व्ह बँकेकडून रोकड मिळावी यासाठी डिसेंबर २०१४ पासून एसबीआयच्या 'मुद्रा पेठीकेचा' रिजर्व्ह बँकेसोबत पत्रव्यवहार सुरू आहे. यासाठी येथील एसबीआय शाखेने ३१ िडसेंबर २०१४, फेब्रुवारी, २८ मार्च, एप्रिल, एप्रिल, १० एप्रिल २०१५ रोजी रिजर्व्ह बँकेसोबत वारंवार पत्रव्यवहार ई-मेल करून संपर्क साधण्यात आला. परंतु रिजर्व्ह बँकेकडून केवळ ३० ते ४० कोटी रुपयेच उपलब्ध करून देण्यात आले. ही रक्कम तुटपुंजी पडत असल्याने एसबीआयच्या इतर शाखेतून रोकड आणून गरज भागवली जात असल्याची माहिती सूत्राने िदली. दरम्यान, रिजर्व्ह बँकेकडून १० एप्रिल पर्यंत पुरेशी रोकड उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु आता ही राशी २० एप्रिल रोजी येणार असल्याचे सांिगतले जात आहे. रोकडच्या तुटवड्यामुळे शहरातील अंदाजे ५०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाल्याचे बोलले जात आहे.
व्यापारी अडते म्हणतात...
देणी थकली

बँकेकडूनचरोकड िमळत नसल्याने शेतकऱ्यांची देणी थकली आहे. ही अडचण शेतकऱ्यांनाही माहिती नाही. त्यामुळे सातत्याने शेतकऱ्यांसोबत वाद होत आहे.
अतुल चांडक, व्यापारी, परतवाडा
व्यवहार ठप्प
रोकडचनसल्यामुळे व्यवहार ठप्प झाले आहेत. बँकेने त्वरित रोकड उपलब्ध करून दिलासा द्यावा.
श्याममालू, अडते, बाजार समिती
रोकड अभावी मोठी अडचण
बाजारसमितीत दर आठवड्याला कोट्यवधी रुपयांचे चुकारे करण्यात येतात. यासाठी अडते व्यापारी बँकांना आगाऊ सूचना देतात. परंतु मागील दोन आठवड्यांपासून रोकड िमळत नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे.
सतीश व्यास, व्यापारी
समस्या लवकर निकाली निघेल
येथील एसबीआय शाखा 'मुद्रा पेठीका' असल्यामुळे रिजर्व्ह बँकेकडून पुरेशी रोकड उपलब्ध करून देणे आवश्यक असते. परंतु अनेक वेळा संपर्क साधूनही रोकड उपलब्ध करून देण्यात आली नाही. रोकड उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून लवकरच ही समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
ए.के. मिश्रा, व्यवस्थापक, एसबीआय शाखा, परतवाडा
शेतकऱ्यांना जावे लागले रीत्या हाताने परत
येथीलकृषी उत्पन्न बाजार समितीत गुरुवारी शेतकऱ्यांनी शेतमाल िवकल्यानंतर अडत्यांना चुकारे करता आले नाही. त्यामुळे एकट्या बाजार समितीतील अंदाजे पाच ते सहा कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाल्याचे व्यापारी, अडत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना माल विकूनही रीत्या हाताने परत जावे लागले.
३० शाखांमधील व्यवहार मंदावले
रोकडच्यातुटवड्यामुळे एसबीआयच्या १५ इतर बँकांच्या १५ शाखांमधील व्यवहार कमालीचे मंदावले आहेत. पैसे काढण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना आवश्यक राशी उपलब्ध होत नसल्यामुळे या बँकांना पैशांसाठी इतर शाखांमध्ये धाव घ्यावी लागत असल्याचे िचत्र शहरात िदसून येत आहे.
एटीएमवर रांगा
शहरातएसबीआयचे १७ एटीएम आहेत. रोकडच्या तुटवड्यामुळे शहरातील बहुतांश एटीएमवर ग्राहकांची गर्दी िदसून येत होती. शहरातील एसबीआयच्या एटीएमवरून दररोज अंदाजे ५० लाख रुपयांचे व्यवहार होत असल्याची माहिती आहे.