आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडीएस’ विद्यार्थिनीची अनुत्तीर्ण झाल्याने नागपुरात आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- दंतवैद्यक अभ्यासक्रमाच्या (बीडीएस) अंतिम वर्षात अनुत्तीर्ण झाल्याने एका 21 वर्षीय तरुणीने विष घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. श्वेता गुणवंत भोयर असे मृत तरुणीचे नाव आहे. श्वेता आई-वडील आणि भावासह शहरातील सक्करदरा बँक कॉलनी येथे राहत होती. बीडीएसच्या अंतिम वर्षात अनुत्तीर्ण झाल्याने ती काही दिवसांपासून तणावाखाली होती. याच कारणामुळे मंगळवारी घरी कोणी नसताना तिने विषारी कीटकनाशक प्राशन केले. सायंकाळी आई घरी परत आल्यानंतर त्यांना श्वेता बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.