आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Between Naxlitaes And Police Clash ; 6 Nxal Died

नक्षलवादी व पोलिसांमध्ये चकमक ; 6 नक्षल ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


गडचिरोली-गडचिरोली जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये शनिवारी रात्री झालेल्या चकमकीमध्ये सहा जण ठार झाल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे. शंकर अण्णा, विनोद, मोहन, घुसू, गीता हुसेन डी आणि सुनीता अशी मृत नक्षलवाद्यांची नावे आहेत.

अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा परिसरातील गोविंदगाव येथे नक्षलवादी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शनिवारी रात्री अतिरिक्त पोलिस आयुक्त राहुल श्रीरामे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस आणि नक्षलवाद्यांत चकमक झाली. यात सहा नक्षलवादी ठार झाले. चकमकीनंतर शोधमोहिमेत पोलिसांना मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडला. ठार झालेल्या सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह अहेरी येथील पोलिस मुख्यालयात आणण्यात आले आहेत. अलीकडेच झारखंडमध्ये नक्षल्यांनी हल्ला केला होता.