आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhandara Rape Offenders Very Soon Will Arrest : Patil

भंडारा प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक : पाटील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गडचिरोली - सध्या देशात गाजत असलेल्या भंडारा येथील तीन अल्पवयीन बहिणींच्या बलात्कार आणि खून प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने सुरू असून लवकरच यातील दोषी आरोपींना अटक करण्यात येईल, असे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बुधवारी सांगितले.

16 फेब्रुवारी रोजी भंडारा येथील मुरमाडी गावातील तीन अल्पवयीन सख्या बहिणींवर बलात्कार करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आरोपी अद्यापही मोकाटच आहेत. बुधवारी या प्रकरणी मृत मुलींच्या आई आणि आजोबांची पोलिसांनी चौकशी केली. या प्रकरणात मुरमाडीतील रहिवासी तपासात सहकार्य करत नसल्याचेही समोर आले आहे.
नक्षली कारवाया थांबल्या नाहीत
गडचिरोली जिल्ह्यात अद्यापही नक्षली कारवाया सुरूच आहेत. जोपर्यंत नक्षली चळवळ थांबत नाही तोपर्यंत नक्षलवाद संपणार नसल्याचे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी येथे सांगितले. गडचिरोली जिल्हा नियोजन समितीतर्फे एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पाटील यांनी वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरे दिले. या वेळी ते म्हणाले, आजच्या तारखेत नक्षल्यांच्या कारवाया थांबल्या नाहीत. त्यामुळे जोपर्यंत ही चळवळ पूर्णपणे थांबणार नाही तोपर्यंत नक्षलवाद थांबणार नाही. नक्षल्याविरोधात गडचिरोली पोलिस चांगले काम करत असल्याचे पाटील यांनी सांगितले.