आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयुक्तांच्या निवासस्थानी उभा होणार बायोगॅस प्रकल्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पर्यावरणाचासमतोल राखण्यास मदत करण्याच्यादृष्टीने मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या शासकीय िनवासस्थानी बायोगॅस प्रकल्प उभारला जाणार आहे. येत्या आठवड्यात हा प्रकल्प साकारला जाईल.
शुक्रवार, जून या जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला मनपाचे पर्यावरण अधिकारी महेश देशमुख यांनी ही मािहती सार्वजनिक केली. त्यांच्यामते इ-वेस्ट, प्लॅस्टिक वेस्ट हॉटेल वेस्टच्या िवल्हेवाटीचे प्रस्ताव याआधीच शासनाकडे पाठवण्यात आले असून छत्री तलावच्या पुनरुज्जीवनाचा िडटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (डीपीआर) तयार करण्यात आला असून तोही मंजुरीसाठी लवकरच शासनाकडे पाठवला जाणार आहे.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प लवकरच
मनपाच्यालालखडी भागात सध्या ३०.५ दशलक्ष लीटर प्रतिदिवस असा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित झाला असून ४४ दशलक्ष लीटर प्रतिदिवस या दुसऱ्या प्रकल्पाचे स्थापत्य काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी सुमारे २८.५० कोटी रुपयांची आवश्यकता असून हा िनधी शासनातर्फे प्राप्त होणार आहे. त्यामुळे सांडपाणी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे कामही लवकरच मार्गी लागणार असल्याचे महेश देशमुख यांनी स्पष्ट केले.
पुढच्या वर्षीपासून पुरस्कार देण्याची योजना
पर्यावरणाचासमतोल राखण्यात मदत करणाऱ्याला पुढच्या वर्षीपासून पुरस्कार देण्याचीही योजना आहे. एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या कालावधीतील कार्यासाठी हा पुरस्कार िदला जाणार असून त्याचे प्रस्ताव पुढील वर्षी एप्रिल महिण्यात स्वीकारले जातील. त्यानंतर जून या पर्यावरण िदनी विजेत्याची घोषणा केली जाणार असून १५ ऑगस्टला तो िवतरित केला जाणार आहे.
असा असेल बायोगॅस प्रकल्प
घरातीलटाकाऊ िकचनवेस्टपासून बायोगॅस प्रकल्प तयार करण्यासाठी आयुक्तांच्या शासकीय िनवासस्थानी पथदर्शी योजना आखण्यात आली आहे. िकमान चार व्यक्तींच्या कुटुंबाला ४५ ते ६० मिनीटे पुरेल एवढा गॅस त्याठिकाणी तयार केला जाईल. भविष्यात असा प्रयोग करणाऱ्यांना मालमत्ता करात सूट देण्याची योजना असून तसा प्रस्ताव लवकरच आमसभेसमोर ठेवला जाणार आहे. महेशदेशमुख, पर्यावरण अधिकारी, मनपा.