आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप उमेदवार मुसळे निवडणुकीतून बादच, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘कलम ३२९ (ब) अनुसार अंतिम क्षणी निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करता येत नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी निवडणूक आयोगाकडे जावे,’ असे निर्देश देत सर्वोच्च न्यायालयाने भाजप उमेदवार सोनबा मुसळे यांची याचिका फेटाळून लावली.

मुसळे यांनी २७ सप्टेंबर रोजी सावनेर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यानंतर माळेगाव येथील मनीष मोहोड यांनी मुसळे हे शासकीय कंत्राटदार असल्यामुळे लोकप्रतिनिधी कायदा-१९५१ मधील कलम ९-अ नुसार निवडणूक लढवण्यास अपात्र आहे, अशी तक्रार नोंदवली. त्यांनी पुराव्यादाखल मे. मुसळे कन्स्ट्रक्शनने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिळवलेल्या १२ कामांची यादी व विविध याचिकांमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या प्रती सादर केल्या होत्या.
दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर निवडणूक निर्णय अधिका-यांनी मुसळे यांना लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ९-अ मधील तरतुदी लागू होत असल्याचा निष्कर्ष नोंदवून त्यांचा अर्ज रद्दबातल केला. या निर्णयाला मुसळे यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु उच्च न्यायालयाने ७ ऑक्टोबर रोजी त्यांची याचिका फेटाळून लावली होती. त्यामुळे मुसळे यांनी
सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र मंगळवारी न्यायालयानेही याचिका फेटाळली.