आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • BJP Congress Come Together For Separate Vidarbh State Nitin Gadkari

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप- काँग्रेस एकत्र आल्यास विदर्भ राज्याची निर्मिती शक्य- गडकरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - वेगळ्या विदर्भाच्या मुद्दय़ावर भाजप आणि काँग्रेस एकत्र आल्यास विदर्भ राज्याची निर्मिती अशक्य नाही, असे मत भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी सोमवारी नागपुरात व्यक्त केले.

पूर्ती समूहाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या मॅक्सी इलेक्ट्रॉनिक रिक्षाचे लाँचिंग गडकरी यांच्या उपस्थितीत झाले त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गडकरी म्हणाले, संसदेत तेलंगणासोबतच काँग्रेसने विदर्भाचाही प्रस्ताव आणावा. भाजप त्या प्रस्तावाला विनाअट पाठिंबा देईल. विदर्भातील काँग्रेस नेत्यांनी प्रथम त्यांच्या पक्षश्रेष्ठींचे मन वळवले पाहिजे. ते शक्य झाल्यास विदर्भ राज्याच्या निर्मितीतील सर्व अडथळे दूर होतील, अशी कोपरखळी त्यांनी खासदार विलास मुत्तेमवार यांचे नाव न घेता मारली.

बॅटरीवर चालणारी रिक्षा : गडकरी यांच्या पूर्ती समूहाच्या वतीने सोमवारी मॅक्सी इलेक्ट्रॉनिक रिक्षाचे लाँचिंग झाले. ही सायकल रिक्षा बॅटरी संचालित असल्याने प्रदूषणमुक्तीला चालना देणारी आहे. ताशी 25 किलोमीटर वेगाने ती चालवता येते. रिक्षाला मोटर व्हेइकल अँक्ट लागू होत नाही. एक लाख रुपयांपर्यंत उपलब्ध होणार आहे.