आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Corrupted But Support To Modi, Ramdevbaba Cleared

भाजपही भ्रष्ट; पण स्वच्छ मोदींना पाठिंबा,रामदेवबाबा यांचे स्पष्टीकरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘आपचा झाडू काँग्रेसच्या हाती असून थर्ड फ्रंटमध्ये सर्व नाकारलेले पक्ष आहेत. भ्रष्टाचारापासून भाजपही अलिप्त नाही, पण मोदी स्वच्छ आहेत म्हणून त्यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा दिला आहे,’ असे स्पष्ट प्रतिपादन योगगुरू बाबा रामदेव यांनी शुक्रवारी केले. पतंजली योग समितीतर्फे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आले असता आयोजित त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला.
रामदेव म्हणाले की, ‘भ्रष्टाचार सर्वच राजकीय पक्षांमध्ये आहे. भाजपही याला अपवाद नाही, पण भाजपचे शीर्षस्थ नेतृत्व स्वच्छ आहे. 5 जानेवारीला दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर झालेल्या सभेत मोदींनी भ्रष्टाचार आणि काळा पैसा खणून काढण्याचे जाहीर केले. याउलट काँग्रेससह इतर पक्षांचे नेते व अध्यक्ष डागाळलेले आहेत. त्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत. म्हणून आपण मोदींना पाठिंबा दिला असून ते पंतप्रधान व्हावेत यासाठी हरत-हेचे प्रयत्न करणार आहे. मी मोदींवर पूर्ण विश्वास टाकला आहे; भाजपवर नाही, असे रामदेवबाबांनी स्पष्ट केले.
मनोभूमिका बदलणार
नरेंद्र मोदी हे दिलेल्या शब्दाला जागणारे, राष्‍ट्रवादी आणि मानवतावादी नेते आहेत. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाची त्यांना चीड आहे. तेच भ्रष्टाचार निखंदून काढू शकतात. याचसाठी ते पंतप्रधान व्हावे म्हणून आपण योग महोत्सवाच्या माध्यमातून लोकांची मनोभूमिका बदलणार असल्याचे रामदेवबाबांनी सांगितले. येत्या 23 मार्चपासून दिल्ली येथे योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यात किमान 10 कोटी लोक सहभागी होतील. तत्पूर्वी 17 मार्चपासून योग सप्ताह साजरा करण्यात येईल. योग महोत्सवाच्या तयारीसाठी 1 मार्चपासून पतंजली समितीचे कार्यकर्ते घरोघरी संपर्क अभियान राबवणार असल्याचे रामदेव यांनी सांगितले.