आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Failed To Keep Promises, Cong On BJP's 100 Days In Power

रावसाहेब दानवेच काँग्रेसमध्ये येणार होते : माणिकरावांचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - विरोधी पक्षांचे २१ आजी-माजी आमदार संपर्कात असल्याचा दावा करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे मंत्री होण्यापूर्वी काँग्रेसमध्ये येण्याच्या तयारीत होते. पक्षाने त्यामुळेच त्यांना मंत्री व प्रदेशाध्यक्ष केले, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला.

शेतकर्‍यांबाबत सरकार गंभीर नाही
‘फडणवीस सरकारच्या कार्यकाळात शेतकरी आत्महत्या ज्या प्रमाणात होत आहेत, तेवढ्या आघाडी सरकारच्या राजवटीतही होत नव्हत्या. सरकार या प्रश्नावर मुळीच गंभीर नाही’, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी नागपुरात बोलताना केली.

फडणवीस सरकारच्या शंभर दिवसांच्या राजवटीवर प्रकाश टाकणारी घोषणाबाज सरकारचे १०० दिवस ही पुस्तिका शनिवारी नागपुरातही प्रकाशित झाली. या वेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री नितीन राऊत यांच्यासह अनेक नेते उपस्थित होत. ठाकरे म्हणाले, मागील चार महिन्यांत सर्वाधिक संख्येने शेतकरी आत्महत्या झाल्याचा दावा केला. मागील दोन दिवसांत आठ आत्महत्या झाल्याचे ते म्हणाले.