आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जखमेवर मीठ चोळू नका, ‘विदर्भ कनेक्ट’चा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासंदर्भात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. ‘विदर्भ कनेक्ट’ या संघटनेने या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. भाजप सरकार आणि शिक्षणमंत्र्यांनी असा निर्णय घेऊन वैदर्भीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करू नये. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष अॅड. मुकेश समर्थ यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिला आहे.

१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. त्यावेळी विदर्भ महाराष्ट्रात सामील झाला. विदर्भाच्या वेगळ्या राज्याची मागणी जोरात होती. फाजल अलीपासून सर्व आयोगांनी वेगळ्या विदर्भ राज्याची संकल्पना मान्य केली होती. केवळ मुंबईत काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून तत्कालीन राजकारण्यांनी भावनिक आवाहन करून विदर्भाला महाराष्ट्रात सामील करून घेतले. या निर्णयाला तेव्हाही विरोधच होता आणि आताही विरोध होतच आहे, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

वेगळ्या विदर्भाचे आश्वासन दिल्यामुळेच भाजपचे ४४ आमदार निवडून आले, याचा विसर पडू देऊ नये. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करून वैदर्भीयांच्या जखमेवर मीठ चोळल्यास २०१९ मध्ये होणा-या निवडणुकीत ४४ चे ४ व्हायला वेळ लागणार नाही, असा खणखणीत इशारा समर्थ यांनी दिला आहे.