आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Leader Narendra Modi Rally Issue At Wardha News In Marathi

नरेंद्र मोदींच्या सभेसाठी वर्ध्यात वृक्षांची कत्तल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची वर्ध्यात 20 मार्च रोजी सभा होत आहे. या सभेसाठी शहरातील स्वावलंबी विद्यालयाच्या मैदानासभोवताली वृक्षांची कत्तल केली जात असल्याने वृक्षप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे.

मोदी यांची पुढील गुरुवारी सभा आयोजित करण्यात आली आहे. सभेसाठी आयोजकांकडून मैदानाची साफसफाई करताना बाभळीचे वृक्ष तोडण्यात आले. जेसीबी यंत्राचा वापर करून कडुलिंबासारखी काही झाडे तोडली. मैदानावर कित्येक वर्षांपासून उभे असलेले वृक्ष तोडण्याचा प्रकार होत असल्याने वृक्षप्रेमींमध्ये नाराजी आहे. काही जणांनी हटकल्यानंतर काही झाडे वाचली. राजकीय नेत्यांच्या सभेसाठी अनेक वर्षांपासून उभे असलेले वृक्ष तोडणे कितपत योग्य आहे. अशी वृक्षतोड करण्याबाबत शासन, प्रशासनासह वृक्षप्रेमींनी गंभीरतेने विचार करावा, अशी मागणी प्रदीप दाते यांनी केली. मैदान परिसरातील मोठे वृक्ष कापण्यात आले नाहीत. मैदान साफ करताना केवळ झुडपे काढण्यात आल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे यांनी सांगितले.