आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छ समाजाशिवाय विकास अशक्य; नितीन गडकरी यांचे अकोल्यात प्रतिपादन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- सर्वच सुशिक्षित सुसंस्कारित असतात असे नाही. आधुनिकीकरणाची कास धरताना आपली संस्कृती विसरून चालणार नाही. देशाला सुसंस्कारित पिढी घडवण्याची खरी गरज आहे. शुद्ध आणि स्वच्छ समाजाशिवाय देशाचा विकास शक्य नाही, असे प्रतिपादन भाजपचे माजी राष्‍ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त रविवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी जोशी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. गडकरी म्हणाले की, सामाजिक दायित्वाच्या भावनेतून काका जोशी यांनी कार्य केले. राजकारण आणि समाजकारण करणार्‍यांनी आपण कशासाठी कार्य करतो आहोत हे समजून घेणे आवश्यक आहे. जोखीम पत्करण्याचा मराठी लोकांमध्ये अभाव दिसतो. मात्र, काका जोशींनी जोखीम पत्करून जीवनात यशस्वी वाटचाल केली. त्यांचा आदर्श सर्वांनीच घ्यायला हवा, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
जीवन हे वनडे क्रिकेट
पूर्वी पाच दिवसांच्या कसोटी क्रिकेट सामन्यातूनही मनोरंजन व्हायचे. आता मात्र तसे राहिलेले नाही. आता वनडे क्रिकेट आले. त्या वनडेसारखेच आपले जीवनही गतिशील झाले पाहिजे, नाहीतर या फास्ट जीवनात आपला टिकाव लागणार नाही, असे मतही गडकरी यांनी व्यक्त केले. देशाला नोकरी मागणार्‍यांची नव्हे, तर नोकरी देणार्‍यांची गरज असल्याचे गडकरी म्हणाले.