आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BJP Maharashtra State Government Cabinet Expansion In November Last Week.

मंत्रिमंडळ विस्ताराचे मुख्यमंत्र्यांचे संकेत, शिवसेनेसाठी संघाचा भाजपवर दबाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- राष्ट्रवादी काँग्रेसच्या छुप्या पाठिंब्यावर भाजपने राज्यात सत्ता स्थापन केल्यामुळे रा.स्व. संघात अस्वस्थता असल्याचे समजते. त्यामुळे शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी संघाने भाजपवर दबाव आणला असल्याची चर्चा आहे. त्यासाठीच सरसंघचालक मोहन भागवत सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याच्या बातम्या होत्या. परंतु भागवत यांचा सोमवारचा मुंबई दौरा अचानक रद्द झाल्याने दोघांत फोनवरून चर्चा झाल्याचेही वृत्त आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा टेकू घेऊन सरकार टिकवण्याच्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या भूमिकेवर चहुबाजूंनी टीकेची झोड उठली आहे. संघाचे नेतृत्वही या भूमिकेवर नाराज असल्याचे संघाचे नेते खासगीत बोलत आहेत. भाजप व शिवसेनेतील संबंधांवरील अनिश्चिततेचे ढग आणि सरकारवरील टांगती तलवार दूर व्हावी, अशीच संघनेतृत्वाची अपेक्षा असल्याचे सांगितले जात आहे. सरसंघचालक भागवत हे सोमवारी एका कार्यक्रमासाठी मुंबईत जाणार होते. तेव्हाच ही चर्चा होण्याचे आडाखे बांधले जात होते. परंतु दौरा रद्द झाल्याने दोघांत फोनवरून चर्चा झाली आहे. संघाच्या एका ज्येष्ठ नेत्याने मात्र यासंदर्भात भाष्य करण्यास नकार दिला. संघप्रमुख अशा बाबींत सहभागी होत नसतात, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, सरसंघचालकांचा मुंबई दौरा रद्द, उद्धवशी फोनवरून चर्चा