आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपने विदर्भाची दुरुस्ती सुचवावी, प्रकाश आंबेडकरांचे भाजपला आव्हान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - विदर्भवादी म्हणवणार्‍या भारतीय जनता पक्षाने तेलंगणाच्या विधेयकात विदर्भ राज्याच्या समावेशाची दुरुस्ती सुचवून आपले विदर्भप्रेम स्पष्ट करावे. यातून खरे विदर्भवादी कोण, हे स्पष्ट होईल, असे आव्हान भारिप -बमसंचे नेते माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी दिले.

आंबेडकर म्हणाले, मागील वेळेस झालेल्या विदर्भाच्या आंदोलनात भाजप सोबत होते. आता तेलंगणाच्या विधेयकाच्या निमित्ताने त्यांना संधी चालून आली आहे. विधेयक संसदेत येईल, त्यावेळी भाजपने त्यात विदर्भ राज्याच्या समावेशाची दुरुस्ती सुचवली पाहिजे. त्यासाठी नितीन गडकरी यांनी आपले वजन वापरावे. विधेयक मतदानाला आल्यावर सारे काही स्पष्ट होईल. भाजपने तसे न केल्यास त्यांचे नाटक उघड होईल, असे ते म्हणाले. तेलंगणासोबत विदर्भाची निर्मिती करण्याचा शब्द काँग्रेस पाळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अलीकडेच मुख्यमंत्र्यांनी विदर्भ सक्षम नसल्याचे जाहीर करून टाकले. प्रत्यक्षात सध्याचे महाराष्ट्र राज्यच सक्षम राहिलेले नाही, असा दावा करून आंबेडकर म्हणाले, शासनाचे उत्पन्न नोकरशाही आणि कर्जाचे व्याज भरण्यावर खर्च होत आहे. केंद्राकडून योजनांसाठी येणारा निधीही त्यावर खर्च न होता कर्ज भागवण्यावर तो खर्च होतो. त्यामुळे जे निकष महाराष्ट्राला लावले जात आहेत, तेच विदर्भालाही लागू होतात. सध्याची देशाची आर्थिक स्थिती पाहता लहान राज्य अस्तित्वात आणण्याचा पर्याय योग्य आहे, असेही ते म्हणाले. आगामी निवडणुका वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर लढवल्या पाहिजे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणावर बोलताना आंबेडकर म्हणाले, मागील तीन वर्षांत अनेक सामाजिक कार्यकर्ते मारले गेले. त्यापैकी एकाही प्रकरणाचा तपास लागला नाही. आगामी निवडणुकीसाठी 23 संघटनांना सोबत घेऊन महाराष्ट्र डेमॉक्रॉटिक फ्रंट स्थापन करण्यात आला. 30 ऑगस्टला फ्रंटच्या कार्यकर्त्यांची कार्यशाळा नागपुरात होत आहे.