आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रदिनी विदर्भात काळा दिवस पाळणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - विदर्भ राज्याच्या आंदोलनाचा भाग म्हणून विदर्भ कनेक्टच्या वतीने येत्या 1 मे रोजी महाराष्ट्रदिनी प्रथमच सर्व जिल्ह्यांमध्ये विदर्भ राज्याचा झेंडा फडकावला जाणार आहे. त्याचप्रमाणे काळा दिवसही पाळला जाणार आहे.

ज्येष्ठ विदर्भवादी नेते व विधिज्ञ अँड. र्शीहरी अणे यांच्या नेतृत्वात सोमवारी पार पडलेल्या ‘विदर्भ कनेक्ट’संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

व्हॉट्सअँप आणि फेसबुकच्या माध्यमातून विदर्भवादी विचारांचे युवक एकत्र आले असून त्यांनी महिनाभरापूर्वीच विदर्भ कनेक्ट ही संघटना स्थापन केली आहे. विदर्भ कनेक्टने आतापर्यंत अनेक लोकसभा उमेदवारांकडून विदर्भ राज्याच्या निर्मितीची हमी देणारे प्रतिज्ञापत्र भरून घेतले आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसादही मिळाला. अलीकडेच विदर्भ कनेक्ट या नावाने वेबसाइटदेखील सुरू करण्यात आली आहे. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनापासून व्यापक लोकचळवळ हाती घेतली जाणार आहे. त्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये कृती गट स्थापन करण्यात आल्याची माहिती विदर्भ कनेक्टचे अध्यक्ष अँड. मुकेश सर्मथ यांनी दिली.नागपुरात हा कार्यक्रम सुप्रसिद्ध विष्णुजी की रसोई येथे होणार आहे. त्याचसोबत विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्येही ठिकाण निश्चित करण्यात येत आहे. लोक चळवळीच्या निमित्ताने सर्व विदर्भवादी संघटनांनाही एकत्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे सर्मथ यांनी सांगितले.