आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्धा जिल्ह्यात बोट उलटून 11 जणांना जलसमाधी; पाच बेपत्ता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा- हिंगणघाट तालुक्यातील वणा नदीच्या पात्रात शेतमजुरांची बोट उलटून 11 जणांना जलसमाधी मिळाल्याची घटना घडली. 20 जणांना बाहेर काढण्यात यश बचाव पथकाला यश आले असून पाच जण अद्याप बेपत्ता आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

चंद्रपुरहून एनडीआरएचे विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. परिसरात सुरु असलेल्या पावसामुळे बचाव कार्यात अडथळा येत आहे.

सूत्रांनुसार, दोन बोटी एकमेकांना बांधून त्यात प्रवासी खच्चून बसवले होते. ही बोट नदीच्या मध्यभागी असलेल्या हनुमानाच्या मूर्तीला धडकून उलटली. दुघर्टनाग्रस्त बोटमध्ये 30 पेक्षा जास्त शेतमजूर होते. यापैकी 20 जणांना वाचवण्यात यश आले आहे. पाच जण अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु असल्याचे वर्ध्याचे जिल्हाधिकारी नवीन सोना यांनी सांगितले आहे.