आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bodybuilding Capsule And Viagra Medicine Sale Incrice

उत्तेजनावर्धक औषधांची विक्री तब्बल साडेतीन कोटींच्या घरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - वयोमानानुसार येणारी दुर्बलता घालवण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिल्या जाणार्‍या उत्तेजनावर्धक औषधांचा बाजार अमरावतीत मोठय़ा प्रमाणावर वाढत आहे. या उत्तेजनावर्धक औषधांचा खप थोडाथोडका नाही, तर तब्बल साडेतीन कोटी रुपयांच्या घरात गेला आहे. लैंगिक, गुप्तरोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ आणि औषध विक्रेत्यांनीदेखील मागील पाच वर्षांत या औषधांचा खप सतत वाढतच असल्यास दुजोरा दिला आहे.
उत्तेजना आणि काही तरी थरारक करण्याच्या नादात बहुतांश जण असेही आहेत, जे वैद्यकीय सल्ला न घेता परस्पर अशा औषधांचे सेवन करत आहेत. केवळ औषधी दुकानांमध्येच नव्हे, तर आता अगदी पानटपर्‍यांवरही सहज उपलब्ध होणार्‍या या औषधी गोळ्या, तेल, स्प्रे, क्रीम आणि लोशनवर ‘पूर्णपणे सुरक्षित’ असे स्टीकर लावले जाते. टीव्ही आणि इतर प्रचार माध्यमांतून आकर्षक जाहिरातबाजी टीनेजरपासून वयाने मोठय़ांपर्यंत अनेकांना भुरळ घालत आहे.
पुढील स्लाइडमध्ये, औषध की विष?