आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणीखोरांकडून नागपुरात ठेकेदाराच्या घरावर बॉम्बहल्ला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर । नागपूर येथील एका ठेकेदाराच्या घरावर क्रुड बॉम्बचा शनिवारी मध्यरात्री हल्ला करण्यात आला. हा बॉम्ब कमी क्षमतेचा असल्याने सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही. मात्र यामध्ये त्यांच्या घराचे नुकसान झाले. सुनील जेजानी असे बॉम्बहल्ला झालेल्या ठेकेदाराचे नाव आहे.
जेजानी यांची नागपूर येथे एक कंपनी आहे. त्यांना काही दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींकडून खंडणीसाठी धमकावण्यात आले होते. तसेच पैसे न दिल्यास त्यांचे घर बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. दरम्यान, पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून अद्याप कोणालाही याप्रकरणी अटक झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले.