नागपूर - एकीकडे अंडरवर्ल्ड
डॉन दाऊद इब्राहिम कुठे आहे यावरुन संसदेत सवाल-जवाब सुरु आहे तर, दुसरीकडे गँगस्टरचा राजकारणी झालेला माजी आमदार अरूण गवळीची पॅरोलवर सुटका करण्यात आली आहे. गवळीचा मुलगा महेशचे 7 मे रोजी मुंबईत लग्न आहे. त्यासाठी त्याला पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.
शिवसेना नगरसेवक हत्या प्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या गवळीला मुंबई उच्च न्यायालया एक दिवसाआड आग्रीपाडा पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याच्या अटीवर 15 दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे. त्यानुसार गवळीला सोडण्यात आले आहे.
गवळीचा मुलगा महेशचे 7 मे रोजी लग्न असून त्याचा स्वागत समारंभ 9 मे रोजी महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लब येथे होणार आहे. त्यासाठी गवळीने पॅरोलवर सोडण्यासाठी अर्ज केला होता.