आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशयावरुन प्रियसीला जंगलात नेऊन जाळले; नागपुरातील घटना

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- दुस-या युवकाशी संबंध असल्याच्या संशयावरून एका युवकाने आपल्या पे्रयसीचा खून करून मृतदेह जंगलात नेऊन जाळल्याची घटना बुधवारी रात्री 8 च्या सुमारास गोरेवाडा जंगलात घडली. धनश्री नीळकंठ रामटेके (19) असे मृत युवतीचे नाव आहे.
याप्रकरणी आरोपी धर्मवीर श्रीराम चव्हाण व त्याचा मित्र सोनू ऊर्फ पंकज चिरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील इंद्रायणीनगर भागात धनश्री आपली आई अलका व छोट्या भावासोबत राहत होती. तिचे वडील नीळकंठ रामटेके हे लष्करात कार्यरत होते. सहा वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले आहे. कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी अलका या कोराडी येथील वीजनिर्मिती केंद्रात सुरक्षा रक्षक पदावर कार्यरत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिकणा-या धनश्रीची फेसबुकवर काही युवकांशी मैत्री झाली होती.
मंगळवारी सकाळी 11.30 वाजता धनश्री घराबाहेर पडली. याच दिवशी तीचा बी.कॉम. द्वितीय वर्षाचा निकाल लागला होता. काही मित्रांसोबत ती एका कारमधून (एम एच 31, सी डब्ल्यू 9266) चित्रपट पाहण्यासाठी गेली होती. रात्रीचे दहा वाजले तरी धनश्री परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. तिचा मोबाइलही बंद होता. शोध लागत नसल्याने अखेर कुटुंबीयांनी ती हरवल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली.
नेलपॉलिशवरून पटली धनश्रीची ओळख- बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोरेवाडा जंगल परिसरात धुराचे लोट उठल्याचे काही युवकांच्या निदर्शनास आले. त्यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, जंगल परिसरात जीप नेणे अशक्य असल्याने पोलिसांना पायीच जावे लागले. काही अंतरावर त्यांना रक्ताचे डाग दिसून आले. आणखी पुढे गेल्यानंतर एका जळालेल्या टायरवर युवतीचा पाय त्यांना दिसून आला. हा प्रकार पाहून पोलिस चकित झाले. या अर्धवट जळालेल्या पायाच्या बोटांवर असलेल्या नेलपॉलिशच्या आधारे हा मृतदेह धनश्रीचाच असल्याचा उलगडा झाला. त्यावरून पोलिस आरोपींपर्यंत पोहोचू शकले.