आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bus Catches Fire, Eight Burned To Death Near Nagpur

नागपूरनजीक व-हाडाच्या बसमध्ये आग, आठ लोकांचा मृत्यू, सहा जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - जळगावहून नागपूरकडे जाणा-या व-हाडाच्या एका बसमध्ये शुक्रवारी पहाटे आग लागून झालेल्या दुर्घटनेमध्ये सुमारे आठ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. हिंगणघाटजवळ झालेल्या या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये चार महिलांचाही समावेश आहे. तर इतर सहा जण यामध्ये जखमी असल्याचे वृत्त आहे.
आग बसमध्ये पसल्याने आणि आत कमी जागा असल्याने लोकांना बाहेर काढण्यास उशीर झाला होता. त्यामुळे बसच्या काचा फोडूनही प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमींवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जळगावहून नागपूरकडे जाणारी ही बस जेव्हा अमरावतीहून पुढे निघाली त्यावेळी बस चालकाला काहीतरी जळाल्याचा वास येऊ लागला त्यामुळे चालकाने बस थांबवली त्यावेळी त्याला गाडीत आग लागल्याचे लक्षात आले. त्याने आत असलेल्या व-हाडी मंडळींना झोपेतून उठवले आणि बाहेर काढू लागला. पण अत्यंत कमी जाता असल्याने, लोकांना लवकर बाहेर पडणे शक्य झाले नाही. मात्र आगीची तीव्रता वाढल्यामुळे अधिक लोक भाजले गेले.
लोकांना बाहेर काढण्यास उशीर होत असल्याने बसच्या काचा फोडूनही काही प्रवाशांना बाहेर काढण्यात येत होते. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. आग बसमध्ये पसरल्यामुळे सुमारे आठ प्रवासी होरपळून ठार झाल्याचे वृत्त आहे. मात्र पोलिस याबाबत काहीही अधिकृत माहिती देण्यास तयार नाहीत.