आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खडखड अन् जीर्ण कारभार ‘बस्स’ झाला; चार तासांपर्यंत बस रस्त्यावर होती उभी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - भरधाव बसचे चाक फुटणे...मध्येच तास अन् तास बसचा खोळंबा..प्रवाशांची दैना...आदी प्रकार एसटी महामंडळाच्या बसेससाठी नवीन नाहीत. शनिवारी दुपारी जीर्ण टायर फुटल्याने अमरावती-मार्डी रोडवर चार तास बस ताटकळत उभी होती.
मार्डी येथून 60 प्रवासी घेऊन अमरावतीकडे येणार्‍या (एमएच 12 सीएच 7112) या बसचा ऐन उतारावर टायर फुटला. चालकाने शिताफीने बस नियंत्रित करून संभाव्य संकट टाळले. अमरावतीपासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर हा प्रकार घडला. सुदैवाने बसमधून सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले. त्यानंतर त्यांना याच मार्गावरील अन्य बसने अमरावती आगारात आणून सोडण्यात आले. या प्रकारामुळे अनेक प्रवाशांची निष्कारण गैरसोय झाली. बसचे टायर जीर्ण असल्याने हा प्रकार घडल्याचे चालकाने सांगितले.

11 जून रोजी अमरावती-मालखेडमार्गे चांदूररेल्वेला निघालेल्या बसचा अशाच प्रकारे ऐन उतारावरच समोरचा टायर फुटला होता. त्यामुळे ‘खडखड’बसेस आणि जीर्ण टायर असलेल्या एसटी महामंडळाचा कारभार कधी सुधारेल, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी असा प्रसंग घडल्यास एकट्या प्रवास करणार्‍या महिलांची मोठी पंचाईत होते.
जीर्ण झाल्याने फुटला समोरचा टायर
४चालू बसचा समोरचा टायर फुटल्याने त्यावर मोठ्या कष्टाने नियंत्रण मिळवले. टायर जीर्ण झाल्याने तो फुटला. डेपोतून मॅकेनिक आल्यावर बस दुरुस्त होईल.
एस. आर. चुटे, चालक.