आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Candle March On The Eve Of Narendra Dabholkar Birth Aniversary

नरेंद्र दाभोलकरांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात 'मेणबत्ती मोर्चा'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - नरेंद्र दाभोलकर यांच्या 67 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र अंधर्शद्धा निर्मूलन समिती आणि पुरोगामी संघटनांतर्फे राज्यात प्रत्येक जिल्हय़ात शुक्रवारी सायंकाळी ‘कँडल मार्च’ काढण्यात येणार आहे. दाभोलकरांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे तसेच त्यांच्या मारेकर्‍यांना तीन महिने लोटूनही अटक झाली नसल्याचा निषेध करण्यासाठी हे आयोजन आहे.

यवतमाळ जिल्हातही शुक्रवारी मुख्य बसस्थानक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून सायंकाळी 7 वाजता कँडल मार्च निघणार आहे. दत्त चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, येरावार चौकातून निघणार असलेल्या या मार्चचा समारोप आझाद मैदानाजवळील महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र अंनिससह शिवराज्य पार्टी, मराठा सेवा संघ, डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड आदी पुरोगामी संघटनांचा सहभाग राहणार असून, हा मूक मोर्चा आणि कँडल मार्च रात्री 10 पर्यंत असणार आहे. मुंबईत मंत्रालयासमोर सुरु असलेले आंदोलन 20 डिसेंबरपर्यंत राज्यात पूर्ववत चालू राहणार आहे.