आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरला पाणीपुरवठा, पुन:प्रक्रिया योजनेसाठी केंद्राचा 38 कोटींचा निधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- नागपूर शहराला चौवीस तास अव्याहतपणे पाणीपुरवठा करणा-या प्रकल्पास केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने निधी दिल्यामुळे या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत पाठपुरावा केला होता.

या पाणीपुरवठा योजनेसाठी 29 कोटी 8 लाख 95 हजार रूपये तर सांडपाण्यावर पुन:प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पासाठी 9 कोटी 75 लाख 83 हजार रूपये अतिरिक्त केंद्रीय स्वायत्ता निधीतून मंजूर करण्यात आल्याचे पत्र केंद्रीय नगरविकास मंत्री कमलनाथ यांनी नुकतेच मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. जेएनएनयूआरएममध्ये केंद्रीय निधीपोटी या प्रकल्पांसाठी 38 कोटी 83 लाख रूपये मिळाले आहेत.