आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंगळसूत्रचोर घेणार ठाणेदारांची विकेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - सध्या मंगळसूत्रचोरीचे सत्र भरात आहे. या चोरट्यांच्या कारवाया आता ठाणेदारांचीच विकेट घेतात की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. या विषयात आयुक्तांनी सर्व ठाणेदारांची बैठक घेतली व त्यांना सक्त ताकीद दिली. वेळ आल्यास ठाणेदारांचे खांदेपालटही होऊ शकते, असे संकेत गुरुवारी त्यांनी दिले.

नऊ दिवसांत झालेल्या मंगळसूत्र लंपास करण्याच्या सहा घटनांची पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. त्याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी पोलिस आयुक्तांनी सर्व ठाणेदारांची बैठक घेतली. यावेळी मंगळसूत्रचोरी रोखण्यासाठी पायदळ तसेच चार्ली कमांडोंच्या गस्तीवर ठाणेदारांनी विशेष लक्ष देण्यासह इतर महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी केल्या. चार्ली कंमाडोंकडून अपेक्षित कामगिरी होत नसल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली.

पोलिसांना अजूनही मंगळसूत्रचोरांचा छडा लावण्यात यश आले नाही. पोलिस यासाठी मेहनत घेत आहेत, यात कोणालाही शंका नाही. याच शोधमोहिमेदरम्यान दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या दोन वाटमारीच्या घटना उघडकीस आल्या. गुन्हे शाखा आणि कोतवाली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली.