आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Challenge On Gutkha Ban In Nagpur High Court Bench

‘गुटखाबंदी’च्या निर्णयाला नागपूर खंडपीठात आव्हान; केंद्र, राज्याला नोटीस,

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - राज्याच्या अन्न व औषध प्रशासनातर्फे काढण्यात आलेल्या गुटखाबंदी अध्यादेशाच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. याप्रकरणी न्या. वासंती नाईक आणि न्या. अतुल चांदुरकर यांच्या खंडपीठाने केंद्रीय आरोग्य सचिव, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण, राज्याचे अन्न व औषध प्रशासन सचिव आणि अन्न व औषध प्रशासन आयुक्त यांना नोटीस बजावली आहे. तसेच तीन आठवड्यात उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.


जया प्रॉडक्ट्स कंपनीने ही याचिका दाखल केली आहे. राज्य सरकारने 23 जुलै 2013 रोजी गुटखाबंदीचा विस्तार करून गुटखा, खर्रा, सुगंधीत तंबाखू, सुगंधीत सुपारी मिश्रण, पान मसाला आदी प्रकारचे उत्पादन, साठा आणि विक्रीवर बंदी घातली. त्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन विभागाने एक अध्यादेश जारी केले. या अध्यादेशानुसार कंपनीला नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे याचिकाकर्त्यांनी अध्यादेशाच्या संवैधानिक वैधतेला आव्हान दिले.