आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chandrapur District Bhadravati Nagar Parishad Election

विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम, भद्रावती शिवसेनेकडेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर - विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून गणल्या गेलेल्या भद्रावती नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने सलग चौथ्यांदा यश मिळवले आहे. राष्ट्रवादीशी आघाडी करूनही काँग्रेसला दारुण पराभव पत्करावा लागल्याने चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय देवतळे यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

भद्रावती नगर परिषदेची निवडणूक काल पार पडली. एकूण 27 सदस्यांच्या परिषदेत शिवसेनेने 14 जागा पटकावून काठावरचे बहुमत मिळवले आहे. या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध इतर असेच चित्र होते. शिवसेनेला शह देण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रवादीशी आघाडी केली होती. काँग्रेसने 16, तर राष्ट्रवादीने 11 जागा लढवल्या होत्या. मात्र, या दोन्ही पक्षांना केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. भारिपने 3, बसपाने 2, भाकप 2, तर अपक्ष आणि शेतकरी संघटनेने प्रत्येकी एक जागा पटकावली. पालकमंत्री संजय देवतळे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळू धानोरकर या पारंपरिक राजकीय प्रतिस्पध्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. निवडणुकीचे निकाल पाहता धानोरकर यांनी एकहाती विजय मिळवला, तर पालकमंत्री देवतळे यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का असल्याचे मानले जाते. मागील विधानसभा निवडणुकीत देवतळे आणि धानोरकर यांच्यात काट्याची लढत झाली होती. देवतळे यांनी धानोरकर यांचा अतिशय कमी फरकाने पराभव केला होता. या निकालामुळे भविष्यातील राजकीय गणितही मांडले जात आहे.

भद्रावती पालिकेतील पक्षीय बलाबल
भारिप 03
काँग्रेस 02
राष्ट्रवादी 02
शिवसेना 14
शेतकरी संघटना 01
अपक्ष 01
भाकप 02
बसपा 02