आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रपूरमधील बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन मंजूर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंद्रपूर - बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या एका आरोपीवर पोलिसांनी वेळेत आरोपपत्र दाखल न केल्यामुळे त्याची जामिनावर सुटका झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले असून महिला व सामाजिक संघटनांकडूनही कारवाईची मागणी होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील किटाळी गावातील सुखदेव साव (52) या व्यक्तीने घरासमोरच राहणा-या एका साडेचारवर्षीय मुलीवर 20 सप्टेंबर 2012 रोजी शारीरिक अत्याचार केल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात दाखल केली होती. या प्रकरणी 21 सप्टेंबरला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आरोपी साव याला अटकही केली. मात्र, वेळेत तपास पूर्ण होऊ शकला नाही.

नियमाप्रमाणे 90 दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल न झाल्याने चंद्रपूरच्या प्रथमश्रेणी न्यायदंडाधिका-यांनी आरोपी साव याला 21 डिसेंबर रोजी जामीन मंजूर केला. पीडित मुलीचे आई- वडील अशिक्षित असल्याने त्यांना आरोपीची सुटका कशी झाली, हे समजू शकले नाही. मात्र, प्रहार या सामाजिक संघटनेने या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर खरा प्रकार उजेडात आला. केवळ पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच बलात्कार प्रकरणातील एक आरोपी आज तुरुंगाबाहेर पडू शकला.