नागपूर - भाजपच्या ज्येष्ठ आमदार, माजी मंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू शोभाताई फडणवीस यांनी बुधवारी वाहतूकदार संघटनांना हाताशी धरून नागपूर जिल्ह्यात तीन तास टोलविरोधी रास्ता रोको आंदोलन केले. विशेष म्हणजे या आंदोलनात भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग नव्हता. शोभाताईंच्या या भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात बरेच तर्कवितर्क लढवले जात असून पुतण्याला
आपले राजकीय अस्तित्व दाखवून देण्याचाच यातून प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे.