आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Minister Chavan's Mister Clean Image Erased

'मुख्यमंत्री चव्हाणांची ‘मि. क्लीन’ प्रतिमा पुसट'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - आदर्श घोटाळ्यामुळे पृथ्वीराज चव्हाण महाराष्‍ट्राचे मुख्यमंत्री झाले. पण तोच आदर्श अहवाल कृती अहवालासह सदनाच्या पटलावर ठेवणे गरजेचे असतानाही मुख्यमंत्री त्यास तयार नाहीत. यातून ते कुणाला पाठीशी घालत आहेत? घोटाळ्यात कोणाकोणाची नावे आहेत? अशी प्रश्नांची सरबत्ती करत मनसेचे गटनेते आमदार बाळा नांदगावकर यांनी केली. मुख्यमंत्र्यांची ‘मि. क्लीन’ प्रतिमा हळूहळू पुसत चालल्याचा आरोपही त्यांनी केला.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर येथे आयोजित पत्र परिषदेत बुधवारी ते बोलत होते. अंतिम आठवडा प्रस्तावात राज्यभरातील विषयांऐवजी फक्त विदर्भातील विषयांचा समावेश करावा, अशी मागणीही नांदगावकर यांनी केली. राज्यातील टोलनाक्यांबाबत मनसेचे आंदोलन थांबलेले नाही. केवळ मनसेच्या आंदोलनामुळेच राज्यातील 65 टोलनाके बंद पडले. अंधश्रद्धा विरोधी विधेयकाला मनसेचा पाठिंबा आहे. त्याला आम्ही विरोध करणार नाही. मात्र विधेयकात काही उपसूचना जरूर करणार आहोत असे ते म्हणाले, अशी माहिती नांदगावकर यांनी दिली.
बाळासाहेबांचे तैलचित्र दोन्ही सभागृहांत लावा
मुंबई आणि नागपूरच्या विधानसभा सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्यात यावे, अशी मागणीही बाळा नांदगावकर यांनी केली. चितळे समितीचा अहवाल, टोलनाक्यांवरील अनधिकृत टोलवसुली, मंत्रालयाच्या आगीत जळालेल्या विविध विभागांच्या फायलींचा तपशील, यासह सुमारे 35 विषय अधिवेशनात हाताळले जाणार आहेत, असे नांदगावकर म्हणाले.