आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनगर आरक्षणावर 15 दिवसांत बैठक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- 'निवडणुकी आधी दिलेले धनगर आरक्षणाचे वचन आम्ही पूर्ण करणार आहोत. महायुती शब्दापासून मागे फिरणार नाही, अशी ग्वाही देतानाच धनगर आरक्षणाबाबत पंधरा दिवसांत महाधिवक्त्यांसोबत बैठक घेण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. धनगर समाज संघर्ष समितीच्या अधिवेशनात ते बोलत होते.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीचा निर्णय भावनेच्या वा उत्साहाच्या भरात आणि राजकीय हेतूने घ्यायचा नाही, तर कायद्याच्या कसोटीवर टिकेल असा घ्यायचा आहे. सर्व कायदेशीर बाबी नीट तपासून पाहू. कारण कोणी ना कोणी या निर्णयाला आव्हान देईल. तेव्हा तो टिकला पाहिजे. म्हणून धनगर समाजाच्या पाच, सात नेत्यांसोबत 15 दिवसांत महाधिवक्त्यांची बैठक बोलावू, असे फडणवीस म्हणाले.
आदिवासी आरक्षणाला धक्का नाही : आदिवासींचे कमी करून धनगर समाजाला आरक्षण देण्यात येणार असल्याचे सांगत दोन समाजात दुफळी माजवण्याचा प्रयत्न काही नेते करत आहेत. आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देण्याची बाब तपासली जाईल, असे फडणवीस म्हणाले.