आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधिकारी,पक्षात नाराजी नाही : फडणवीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- राज्यात सनदी अधिका-यांच्या बदल्यांवरून पक्ष अथवा अधिका-यांमध्ये कुठलीही नाराजीची भावना नाही, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी नागपुरात केला. अलीकडेच झालेल्या बदल्यांवरून सनदी अधिका-यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
फडणवीस सरकारमधील ज्येष्ठ मंत्री एकनाथ खडसे यांनीही बदल्यांवरून नाराजीचा सूर आळवला आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी पक्ष अथवा अधिका-यांमध्ये बदल्यांवरून कुठलीही नाराजी नसल्याचा दावा केला. अधिकाऱ्यांच्या बदल्या नियमानुसार व राज्य शासनाच्या धोरणानुसारच झालेल्या आहेत. त्यामुळे नाराजीचा प्रश्नच उद्भवत नाही, असे फडणवीस म्हणाले. काही अधिका-यांनी आपल्या अडचणी सांगितल्या आहेत. त्यावर विचार करून योग्य तो निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकरी पॅकेजवर नाराजी व्यक्त केली आहे, याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले, राज्य शासन या प्रश्नावर अतिशय गंभीर आहे. प्रश्नाचा व्याप लक्षात घेऊन राज्य सरकारने केंद्राकडे अतिरिक्त मदतीची मागणीदेखील केली आहे.