आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Minister Go Marriage Function Without Knowing Farmers Problems

शेतक-यांकडे पाठ फिरवून मुख्यमंत्री निघाले आमदाराच्या मुलीच्या लग्नाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : शेतक-यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काढण्यात आलेली पदयात्रा पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील घरापासून काही अंतरावरच अडवली.
नागपूर - शेतक-यांच्या विविध प्रश्नांसाठी सेवाग्राम येथील बापू कुटीपासून निघालेली शेतक-यांची पदयात्रा सोमवारी नागपुरात पोहोचली. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर धडकणार होते. परंतु पोलिसांनी मॉरिस कॉलेज टी-पॉइंटवरच मोर्चेक-यांना अडवले. तर शेतक-यांना न भेटताच, त्यांच्या व्यथा ऐकून न घेताच मुख्यमंत्री आमदाराच्या मुलीच्या लग्नाला निघून गेले.
सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास ही पदयात्रा नागपुरात पोहोचली.
मात्र आधीपासूनच मागावर असलेल्या पोलिसांनी शेतक-यांना मोर्चा पॉइंटवरच अडवले. त्यानंतर मुख्यमंत्री भेटायला येतील, अशी आशा मोर्चेक-यांना होती. मात्र ते आमदार सुनील केदार यांच्या मुलीच्या लग्नाला निघून गेले. आपले प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना पाठवले. रावते यांनी मोर्चेक-यांची भेट घेऊन सरकार शेतक-यांच्या मागण्यांविषयी संवेदनशील असल्याचे सांगितले. या संदर्भात मुख्यमंत्र्यांची लवकरच भेट घालून देऊ, असे आश्वासनही रावते यांनी दिले. शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते चंद्रकांत वानखेडे व किसान अधिकार अभियानातर्फे पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत वर्धा, चंद्रपूर, वाशीम, वणी, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी सहभागी झाले होते.