आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राच्या धर्तीवर राज्यातही मुख्यमंत्री ग्राम सडक योजना; अर्थमंत्री मुनगंटीवार यांचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- केंद्र सरकारच्या पंतप्रधान ग्राम सडक याेजनेच्या धर्तीवर अाता राज्यात ‘मुख्यमंत्री ग्राम सडक योजना’ लागू करणार असल्याचे संकेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिले.

मुनगंटीवार हे बुधवारी नागपूर दौ-यावर होते. त्यांनी नागपूर विभागाच्या जिल्हा नियाेजन समितीची बैठक घेतली. या बैठकीत मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवायला सांगितले. "केंद्राच्या धर्तीवर राज्यातही मुख्यमंत्री ग्राम सडक योजना लागू करण्याच्या प्रयत्नात सरकार आहे. या योजनेसंदर्भात ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्ष एक प्रेझेंटेशन दिले आहे. मुख्यमंत्र्यांनीही योजनेला होकार दर्शवला असून लवकरच या योजनेचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर ठेवण्यात येईल,' असे मुनगंटीवार म्हणाले.

तीन टप्प्यांत याेजना
ही प्रस्तावित योजना ग्रामीण, तालुका आणि जिल्हा अशा तीन स्तरांवर राबवण्यात येईल. किमान २५० लोकसंख्या असलेल्या गावांनाही ती लागू करण्यात येईल. या योजनेमुळे जिल्हा नियोजन समितीचा मोठा निधी वाचेल आणि तो इतर विकास कामांवर खर्च करण्यात येईल, अशी माहिती मुनगंटीवारांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. याशिवाय राज्य सरकार कौशल्य विकास योजनाही लागू करण्याच्या प्रयत्नात असल्याचे ते म्हणाले.