आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Chief Minister With BJP MLAs Visited RRS Smriti Bhavan

मुख्यमंत्र्यांसह भाजपचे आमदार ‘संघ दरबारी’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : नागपुरातील संघ मुख्यालयातून बाहेर पडताना भाजपचे मंत्री, आमदार.
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह भाजपचे मंत्री आणि आमदारांनी गुरुवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग येथील स्मृती भवन परिसराला भेट दिली. यानिमित्ताने संघाच्या वतीने चहापान तसेच लोकप्रतिनिधींच्या स्वागताचे आयोजन करण्यात आले.

गुरुवारी सकाळी फडणवीस, बागडे, भाजपचे मंत्री तसेच सर्व आमदार रेशीमबाग परिसरात दाखल झाले. या नेत्यांनी डॉ. हेडगेवार स्मृतिस्थळाचे दर्शन घेतल्यावर संघाच्या वतीने चहापानाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर संघचालक डॉ. दिलीप गुप्ता यांनी लोकप्रतिनिधींना संघाच्या नागपुरातील कार्याची माहिती दिली.या भेटीबद्दल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, ‘दरवर्षीच असा भेटीचा कार्यक्रम होत असतो. आमच्या दृष्टीने हे प्रेरणास्थळ आहे. येथून मिळणारी ऊर्जा आम्हाला व्यक्तिगत जीवनातही उपयोगी पडते.’