आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टरांच्या दुर्लक्षाने बालिकेचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - किरकोळ आजारी असलेल्या एका 9 वर्षीय मुलीचा एडीएन रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना कळमना भागात घडली. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करीत रुग्णाच्या नातेवाइकांनी रुग्णालयाची तोडफोड केली.

निकिता केशव बोरकर असे मृत मुलीचे नाव आहे. सोमवारी रात्री निकिताला उलट्या सुरू झाल्या. त्यामुळे आईने तिला रुग्णालयात दाखल केले. रात्री निकिताच्या आईने अनेकदा डॉक्टरांना मुलीची तब्येत खालावत असल्याच्या सूचना दिल्या. परंतु रात्रभर एकही डॉक्टर निकिताची प्रकृती बघण्यासाठी फिरकला नाही. त्यामुळे उपचाराविनाच निकिताचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांनी तोडफोड करत संताप व्यक्त केला.