आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रंगाच्या डब्यात बुडून चिमुकलीचा मृत्यू, नागपूर शहरातील हृदयद्रावक घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - खेळताना रंगाच्या डब्यातील पाण्यात बुडून एका १४ महिन्यांच्या मुलीचा करुण अंत झाला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. माही महेंद्र सहारे असे त्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे.

महेंद्र हे अापल्या कुटुंबीयांसह सुभाषनगर येथील रहिवासी अजय नेवारे यांच्या घरी भाड्याने राहतात. त्यांचा पानटपरीचा व्यवसाय आहे. महेंद्र हे गुरुवारी दिवसभर पानटपरीवर होते. सायंकाळी ५ च्या सुमारास मुलगी माही ही अंगणातील एका रंगाच्या डब्यातील पाण्यात खेळत होती. त्या वेळी तिची आई पुष्पा काही अंतरावर काम करत होती, अचानकपणे माहीचा आवाज येणे बंद झाल्याने तिच्या आईने तिच्याकडे बघितले असता, रंगाच्या डब्यात माहीचे डोके आणि पाय वर झाले होते. पुष्पा यांनी ताबडतोब तिला बाहेर काढले. तोपर्यंत बराच उशीर झाला होता. डब्यातील पाण्यात डोके बुडाल्याने माहीचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी जाहीर केले. मुलीच्या मृत्यूमुळे सहारे कुटुंबीयांवर दु:खाचा डाेंगर काेसळला असून तिच्या अाईने तर हंबरडाच फाेडला. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.