आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वच्छतेचे सारे नियम पाळा, तरच बसेल घाणीला आळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहराच्या विस्तारासोबतच बाजारपेठही झपाट्याने वाढली. जिल्हाभरातूनही दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक मुख्यालयी येतात. येथील बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांना प्रचंड असुविधा व कुचंबणा सहन करावी लागते.

मूलभूत सुविधांअभावी बसस्थानकासमोरील सायन्सकोर मैदानाची सुरक्षा भिंत, नेहरूमैदानातील मनपा शाळा, मॉडेल रेल्वे स्थानकाच्या बाजूचा इर्विन-मालवीय चौकाकडे जाणारा रस्ता आदी ठिकाणी नागरिकांनी अघोषित मूत्रीघर निर्माण केले आहे. गजबजलेल्या भागांत महापालिकेकडून स्वच्छतागृह निर्माण करण्याची आवश्यकता असूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. अपवाद म्हणून सुलभ इंटरनॅशनल या संस्थेने काही भागांमध्ये शौचालय व मुतार्‍यांची व्यवस्था केली. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत ही सुविधा तोकडी आहे. तेथेही अस्वच्छतेचा कळस गाठला गेल्याने उघड्यावर लघुशंका करण्याखेरीज पर्यायच शिल्लक नसल्याचे काही नागरिकांनी सांगितले.
महिलांसाठीचे 35 फायबर टॉयलेट वादग्रस्त
शहरातील विविध भागांमध्ये केवळ महिलांकरिता 35 सार्वजनिक फायबर टॉयलेट लावण्यात आले आहेत. मात्र, सुरुवातीपासून ते वादग्रस्त ठरले आहेत. सिंटेक्सचे फायबर टॉयलेट सव्वा लाखांत उपलब्ध असताना महापालिकेने जमनोत्री इंटरनॅशनल एजंसीकडून दुपटीहून अधिक म्हणजे प्रत्येकी दोन लाख 85 हजार रुपयांत खरेदी केली. शिवाय स्वच्छतेसाठी पाणी, पेपर नॅपकीन आदी साहित्याचा त्यामध्ये वानवा आहे. महत्त्वाचे म्हणजे, हे फायबर टॉयलेट बहुतांश ठिकाणी गर्दीच्या दिशेने उघडतात. त्यामुळे ते निरुपयोगी ठरत आहेत.
घाण केल्यानंतर दंडाची तरतूद : कचराकुंडीव्यतिरिक्त इतरत्र कचरा फेकण्यासाठी 100 रुपये दंड आहे. हॉटेलमधील टाकाऊ पदार्थ रस्त्यावर टाकण्यासाठी 400, हानिकारक पदार्थ, केमीकल्स उघड्यावर टाकण्यासाठी हजार, औद्योगिक टाकाऊ वस्तू खुल्यावर टाकण्यासाठी 600 रुपये दंड होतो.
व्यापारी संकुलांचीही आहे तीच अवस्था
प्रत्येक व्यापारी संकुलामध्ये स्वच्छतागृह बंधनकारक आहे. मात्र, जुन्यांसह बहुतांश नवनिर्मित संकुलांमध्ये तशी व्यवस्था नाही. खासगी तसेच महापालिकेच्या व्यापारी संकुलांची अवस्थाही सारखीच आहे. पालिकेची शहरात 27 व्यापारी संकुले आहेत.
येथे आहेत सुलभ शौचालय
जयस्तंभ चौक
गाडगेनगर
गांधी चौक
बसस्थानकाजवळ
बडनेरा, नवीवस्ती
बारीपुरा (जुनीवस्ती)
मनपाचे 57 सार्वजनिक शौचालय, मात्र मुतारी नाहीत.