आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CM Devendra Fadnavis Gives Surprise Visit To Nagpur Jail

मुख्यमंत्री फडणवीसांची नागपूर तुरुंगाला अचानक भेट, प्रशासन खळबळून जागे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- नागपूर तुरुंगाच्या अनेक सुरस कथा सध्या बाहेर येत आहेत. गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा भोगत असलेले कैदी पळून गेल्यानंतरही तरुंग प्रशासनाची झोप उघडलेली दिसत नाही. या पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी तुरुंगाला अचानक भेट दिली. या भेटीने प्रशासन खळबळून जागे झाले.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी तुरुंगातील कमाकाजाची माहिती करुन घेतली. तुरुंगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही सुचना केल्या. या भेटीची पूर्वकल्पना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ताफ्यातील अधिकाऱ्यांनाही दिली नव्हती. नागपूर विमानतळावर विमान उतरल्यानंतर त्यांनी लगेच तुरुंगाला भेट देणार असल्याचे सांगून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
या भेटीनंतर त्यांनी ट्विटरवर सांगितले, की मी नुकतीच नागपूर तुरुंगाला भेट दिली. या तुरुंगात अनेक सुधारणा करणे आवश्यक आहे.
पुढील स्लाईडवर बघा, मुख्यमंत्र्यांनी नागपूर कारागृहात दिलेल्या भेटीचा फोटो... आणि त्यांची ट्विट...