आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेगळ्या विदर्भावर आम्ही ठाम, नागपुरात मिनी मंत्रालयाचा विचार- फडणवीस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समोवारी नागपुरात झालेल्या पत्रकार परिषदेत वेगळ्या विदर्भाच्या आपल्या वचनावर भाजप ठाम असल्याचे म्हटले आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी हा चेंडू केंद्राकडे टोलवला. केंद्र सरकार आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर नागपुरात मिनी मंत्रालय थाटण्याचा विचार सुरू असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

काय म्हणाले वेगळ्या विदर्भाबाबत
विदर्भ राज्याच्या मागणीबाबत बोलताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, भाजप आपल्या वचनावर कायम आहे. केंद्र सरकार आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व यासंबंधात योग्य निर्णय घेणार आहे.
नागपुरात मिनी मंत्रालय
मंत्रालयाचे कामकाज पूर्णपणे कॉम्पयुटराईज्ड करण्याचा सध्या सरकारचा विचार सुरू आहे. सरकारी कामकाजासाठी ई प्लॅटफॉर्म तयार झाल्यानंतरच मिनी मंत्रालयाची संकल्पना प्रत्यक्षात उतरवता येणार आहे. त्यासाठी आयटी विभागाची बैठक बोलावली जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
विदर्भातील मुद्दे सोडवण्यासाठी विधानसभेचे नागपुरातील हिवाळी अधिवेशन अधिक काळ चालवणे गरजेचे असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे अजेंड्यावर येणा-या विषयांबाबत चर्चा पूर्ण होईपर्यंत अधिवेशन सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भात होणा-या शेतक-यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी कृषी विकासासंबंधीच्या उपाययोजनांवर लक्ष देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोणत्या मुद्यावर काय म्हणाले CM

एलबीटी - याबाबतच्या पर्यायाचा सरकार विचार करत आहे. गुंतवणूकदार आणि व्यावसायिक यांच्याशी चर्चा करून याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल.

जवखेडा हत्याकांड - तपासाची दिशा बदलण्यात आली आहे. पोलिस महासंचालकांकडून या प्रकरणाची माहिती घेण्यात आली आहे. आरोपींना लवकरच अटक होईल.

पोलिस दल - राज्यातील पोलिस दलाला बळ देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

डान्स बार - आघाडी सरकारच्या भूमिकेवर कायम राहणार

आदिवासी भाग - शहरी विकासाबरोबरच आदिवासी क्षेत्रांच्या विकासासाठी नवी धोरणे लागू केली जातील. त्यामुळे त्या भागांचा विकास करणे शक्य होईल.