आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीएमच्या ‘गृहमंत्री’ देणार कार्यकर्त्यांना धडे, सत्त्वशीला देणार सोशल मीडियाचे प्रशिक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काँग्रेस सक्षम करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. या निवडणुकीत होणारा सोशल मीडियाचा वापर व प्रभाव पाहता काँग्रेसचे राज्यस्तरीय सोशल मीडिया सेमिनार 18 ते 20 ऑगस्टदरम्यान बुलडाणा येथे आयोजित करण्यात आल असून या सेमिनारमध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्त्वशीला चव्हाण राज्यातील निवडक अशा 300 कार्यकर्त्यांना सोशल मीडियाचा निवडणुकीच्या दृष्टीने प्रभावी वापरासंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.

जिल्हा काँग्रेस समितीच्या आग्रहामुळे हे सेमिनार बुलडाण्यामध्ये आयोजित केले आहे. यामध्ये जिल्ह्यातील निवडलेले 35 काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. शहरातील बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी क्लबमध्ये हे सेमिनार होत आहे. या सेमिनारमध्ये प्रामुख्याने मराठवाडा व विदर्भातील काँग्रेसचे निवडक 300 कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

या घटकांचा समावेश
दोन दिवस चालणार्‍या या प्रशिक्षणामध्ये सध्या जनसामान्यांवर प्रभाव असलेला सोशल मीडिया कसा वापरावा, त्यावर पक्षाची पोस्ट टाकताना कोणती काळजी घ्यावी, त्याचे तांत्रिक ज्ञान, पक्षाच्या उमेदवाराच्या संपर्कात कसे राहावे, यासह अनेक छोट्या-छोट्या बाबींची माहिती देण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी पाच जणांची टीम यासाठी निवडली असून, या पाच जणांपैकी दोन जण हे थेट मुंबई येथील अत्याधुनिक वॉर रूमशी कनेक्ट राहतील.

बूथस्तरावर मायक्रो प्लॅनिंग
या सेमिनारनंतर 20 ऑगस्टला भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त बूथस्तरावर कार्यक्रम घेण्यात येणार आहे. काँग्रेस बूथ कमिटीच्या बळकटीकरणासाठी मायक्रो लेव्हलवर तयार करण्यात आलेल्या कार्यक्रमाची या वेळी माहिती देण्यात येणार आहे. त्यानंतर हाच कार्यक्रम 21 ऑगस्टला जिल्हा परिषद गटनिहायस्तरावर, तर 28 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरदरम्यान विधानसभा स्तरावर घेण्यात येईल. भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसनेही बूथस्तरावर मायक्रो लेव्हवर प्लॅनिंग केले असून, स्थानिक पातळीवरील बळकटीकरणास यात प्राधान्य देण्यात येणार आहे.