आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Coal Mafia And Gambler Shital Singh Murder In Nagpur

ऐन दिवाळीच्या रात्री दुहेरी हत्याकांड, नागपुरात \'कोळसा माफिया\'ची निर्घृण हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर/मुंबई- ऐन दिवाळीच्या दिवशी (शुक्रवारी) राज्यात गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. नागपूरात कोळसा माफिया शीतल सिंह यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवाळी पार्टीत गोळीबार झाल्याने एकाचा मृत्यु झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर जिल्ह्यातील कन्हान भागातील कुख्यात गुंड ‍शीतल सिंह याची दिवाळीच्या मध्यरात्री निर्घृण हत्या झाली. शीतल सिंह याची कोळसा माफिया अशी ओळख होती.
कन्हानमध्ये एका क्लबमध्ये शीतल सिंह याने दिवाळीच्या रात्री गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. क्लब मालक शरद गोमेकर आणि सुरज गोमेकर या दोघांनी शीतर सिंह याची समज काढली. तरीदेखील शीतल सिंह ऐकायला तयार नव्हता. तिघांमध्ये झालेल्या वादातून गोमेकर बंधूनी शीतल सिंह याच्यावर दोन गोळ्या झाडल्या. शीतल सिंह याला तातडीने रुग्णालयात हलवत असताना गोमेकर बंधुंनी कारच्या काचा फोडून पुन्हा सिंह याच्यावर पुन्हा गोळ्या यात सिंह याचा जागीच मृत्यू झाला. यात सिंह याचा भाऊ जखमी झाला आहे.

शीतल सिंहच्या विरोधात खंडणी, हाणामारी, दहशत पसरवणे, या सारखे गंभीर गुन्ह्यांची पोलिसांत नोंद होती. दरम्यान, कन्हान ग्रामीण पोलिसांनी गोमेकर बंधुंना अटक केली आहे.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, दिवाळी पार्टीत गोळीबार, एकाचा मृत्यु