आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Come Together For Unity Of Vidarbh, Deshmukh Urge In Divya Marathi Publish Eve

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘दिव्य मराठी’च्या अकोला आवृत्तीचे लोकार्पण, राज्यातील सहावी आवृत्ती प्रकाशित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - विदर्भाच्या विकासासाठी पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षणमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केली. दैनिक दिव्य मराठीच्या राज्यातील सहाव्या आणि विदर्भातील पहिल्या अकोला आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. प्रमिलाताई ओक सभागृहात शनिवारी दुपारी एक वाजता आयोजित लोकार्पण सोहळ्याप्रसंगी अकोलेकरांनी ‘दिव्य मराठी‘वर शुभेच्छांचा वर्षाव केला.


दैनिक भास्कर देशातील सर्वात मोठा वृत्तपत्र समूह आहे. हिंदी, गुजराती, इंग्रजी आणि मराठी या चार भाषांमध्ये वृत्तपत्र प्रकाशित करीत ‘दिव्य मराठी’ने वृत्तपत्र क्षेत्रातील आपले स्थान बळकट केल्याचे देशमुख म्हणाले. विदर्भाच्या विकासासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करतानाच विकासात वृत्तपत्रांचेही योगदान महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले.


व्यासपीठावर रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत, अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे, दैनिक दिव्य मराठीचे मुख्य संपादक कुमार केतकर, भास्कर समूहाचे अध्यक्ष रमेशचंद्र अग्रवाल, संचालक सुमीत अग्रवाल, बिझनेस स्टेट हेड निशित जैन, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार वसंतराव खोटरे उपस्थित होते. ‘दिव्य मराठी’तर्फे प्रमुख पाहुण्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन ‘दिव्य मराठी’चे स्टेट एडिटर अभिलाष खांडेकर यांनी केले, तर निवासी संपादक प्रेमदास राठोड यांनी आभार मानले. या प्रसंगी मान्यवरांनी ‘दिव्य मराठी’च्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अकोला आवृत्तीच्‍या लोकार्पण सोहळयाचे फोटो आणि मान्‍यवरांचे भाषण वाचण्‍यासाठी क्लिक करा पुढच्‍या स्‍लाईडला...