आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माजी राष्ट्रपतींच्या आमदार मुलाने पिस्तुल रोखले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे चिरंजीव व अमरावतीचे कॉँग्रेस आमदार रावसाहेब शेखावत यांनी पिस्तूल रोखल्याचा आरोप कॉँग्रेसच्याच एका माजी कार्यकर्त्याने केला आहे. याप्रकरणी त्याने शेखावतांविरुद्ध रविवारी शहर कोतवाली पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

मुन्ना अलीशा अजहर अली (वय 44) हा पूर्वी कॉँग्रेसचा कार्यकर्ता होता. फ्लॅक्स आणि बॅनर तयार करून शहरात लावणे हा मुन्ना अलीशा यांचा व्यवसाय आहे. 9 ऑगस्टला सकाळी 7 वाजता श्याम चौकातील उड्डाण पुलाजवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बॅनर लावत असतांना आमदार शेखावत, त्यांचे स्वीय सचिव संजय पाटील व अन्य दोघे एका वाहनातून आले. ‘आमचे बॅनर लावणे सोडून तू राष्ट्रवादी कॉँग्रेस, आमदार राणा, विश्वासराव देशमुख यांचे बॅनर का लावत आहेस’, अशी विचारणा करुन शेखावत यांनी पिस्तुल रोखले, असा आरोप मुन्ना यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत केला आहे. विशेष म्हणजे आमदार शेखावतांच्या अंतर्गत गोटातील व्यक्ती आणि माजी कॉंग्रेस शहराध्यक्ष विश्वासराव देशमुख हे मुन्ना अलीशासोबत तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात पोहचले होते.

याप्रकरणाचा शास्त्रीय तपास करून चौकशीअंती पुढील कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणेदार अशोक धोत्रे यांनी दिली.