आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Leader Disapeard In The Conection Of Mallewar

नक्षल्यांना रसद पुरवणारे काँग्रेस नेते मल्लेलवार अद्याप फरारच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गडचिरोली - नक्षलवाद्यांना स्फोटके, काडतुसे तसेच औषधांचा साठा पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले काँग्रेस नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार आणि पोर्ला प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र कोरपे अद्यापही फरारच आहेत. दरम्यान, रविवारी पोलिसांनी मल्लेलवार यांच्या गडचिरोलीतील बंद घरावर नोटीस चिकटवून ठाण्यात हजर राहण्याची सूचना केली आहे.


शुक्रवारी सायंकाळी भामरागड तालुक्यात शासकीय रुग्णवाहिकेतून शस्त्रसाठा येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गाडीची पाहणी केली असता त्यात स्फोटके आढळून आली होती.