आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेसचे आमदार रावसाहेब शेखावत यांना भर चौकात मारहाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पुत्र व काँग्रेसचे अमरावतीचे आमदार रावसाहेब शेखावत यांना दहीहंडीच्या सोहळ्यात व्यासपीठावर एकायुवकाने गुरुवारी सायंकाळी मारहाण केली. खुद्द पोलिस आयुक्तांसमोर घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिस ठाणे व पोलिस आयुक्तालयावर मोर्चा नेला. आरोपीला ताब्यात देण्याची मागणी त्यांनी केल्याने पोलिसांनी त्या युवकाला गुप्त ठिकाणी हलविले आहे.
दहीहंडीच्या बक्षीस वितरणाचा सोहळा राजकमल चौकात सुरू होता. रावसाहेब शेखावत भाषण देण्यासाठी उभे होताच गजेंद्र उमरकर अचानक समोर आला आणि त्याने रावसाहेबांना मारहाण केली. अचानक घडलेल्या या प्रकाराने व्यासपीठावरील नेते तसेच अधिकारी अचंबित झाले. पोलिस व काही कार्यकर्त्यांनी युवकाला तत्काळ पकडले.